स्वतः शाडूची माती हाताळून, आपल्या बाप्पाला स्वतःला हवा तसा आकार देत, मुलांनी समरस होऊन साकारलेली गणेशमूर्ती अधिक भावपूर्ण असेल, नाही का?
दरवर्षी प्रमाणे यावेळीही डेल्टा क्लासेस घेऊन येत आहे.. आपल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टिकोनासह.. एक खास उपक्रम…
🏵 “शाडूमाती गणपती कार्यशाळा” 🏵
मुलांच्या एकाग्रतेला त्यांच्या नकळत आवाहन करून, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी,
त्यांना स्वतःच्या सृजनशीलतेची जाणीव होताना त्यांची निरागसता तशीच रहावी,
त्यांना मातीसोबत खेळण्याचा अनुभव मिळावा आणि पर्यावरणाकडे पाहण्याची खास दृष्टी मिळावी या विशेष व्यापक दृष्टिकोनातून हा उपक्रम घेत आहाेत.
अपेक्षित वयोगट – ३ वर्षापुढील मुले-मुली, सोबत त्यांचे पालक _
दिवस – २९ आणि ३१ ऑगस्ट २०१९
स्थळ -ऑरेंज नेस्टलिंग प्रिस्कूल, ‘चिंतामणी ‘ बिजली सोसायटी,काळेपडळ,पुणे.
प्रशिक्षिका -साै.स्वाती पाठक*
मूल्य – रु. 600/- प्रतीव्यक्ती
अायोजक – डेल्टा क्ल्सासेस &ऑरेंज नेस्टलिंग प्रिस्कूल
मातीच्या सान्निध्यात आल्याने मुलांची नाळ मातीशी जोडलेली राहते!
त्यामुळे चुकवू नयेच, अशा या उत्सवात आपल्या मुलांना आवर्जून सामील होऊ द्या..
महत्त्वाचे…
१) शाडूची माती कार्यशाळेतच पुरवली जाईल.
२) “बाप्पाला” घरी नेण्यासाठी पुठ्ठा आणावा.
३) मुलांना (आणि पालकांनाही) पूर्ण आनंद घेता यावा, यासाठी “मळले तरी चालतील” असेच कपडे घालून पाठवावे. शिवाय, एखादे फडके सोबत द्यावे.
४) शाडूच्या गणेशमूर्ती पूर्ण वाळल्याशिवाय त्यावर रंगकाम करता येत नाही, त्यामुळे रंग आणू नयेत.
५) रंगकाम कसे व केव्हा करावे, याबद्दल कार्यशाळेदरम्यानच मार्गदर्शन करण्यात येईल.
६)मुलांच्या हाताची नखे वाढलेली नसावीत.
नावनोंदणी/अधिक माहितीसाठी संपर्क ..
स्वाती -9421477301
रोहित सर – 9765577277
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
.